उस्मानाबाद :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांच्या हस्ते संपन्न झाला. मतदार दिनाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने  विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे  प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विजेत्यास पुष्पगुच्छ देवून योवळी सत्कार करण्यात आला.
    यावेळी विद्यार्थ्‍यांनी देशभक्तीपर गीत सादर केली. डॉ. आवटे यांनी विद्याथ्या्रंना आपला देश व  देशातील राज्यघटनेचे महत्व पटवुन देवून विद्यार्थ्यांना  राज्यघटनेबाबत सखोल मार्गदर्शन केले.
     यावेळी  डॉ.  जटनुरे, श्रीमती मेनकुदळे ,श्रीमती बनसोडे, पौळ, गजधने, श्रीमती भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त्‍केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन कु. अश्विनी चौबे तर आभार कु. अंजली माळी यांनी  केल्यानंतर वंदेमारतम या गीताने कार्यक्‌रमांची सांगता झाली.
 
Top