उस्मानाबाद :- सैन्य व पोलीस दलात भरती होवू इच्छिणा-या युवक- युवतींना सैन्य व पोलीस दलात भरतीपुर्व प्रशिक्षण मेस्को कॅरिअर अॅकॅडमी करंजेनाका, सातारा येथे देण्यात येणार  असून  इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी केले आहे.
     सदरहू प्रशिक्षण  30 दिवसाचे  असून हे प्रशिक्षण 5 फेब्रुवारी  ते  6 मार्च 2014 या कालावधीचे आहे. या प्रशिक्षण कालावधीत निवास व भोजन  शुल्क रक्कम 6 हजार  भरावे लागणार आहे. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्को व्दारा मेस्को कॅरिअर अकॅडमीतर्फे हे प्रशिक्षण देण्यात येणार असून आहे.
   इच्छुकांनी अधिक माहितीसाठी मोबाईल क्र.7588624043 किंवा 9420697807  संपर्क साधावा अथवा महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्केाच्या http://mescoltd.co.in/pages/mcasataraAbout.aspx संकेतस्थळावर संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
 
Top