उस्मानाबाद -: लातूर विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांना सूचित करण्यात येते की, इ. 12 वी फेब्रु/ मार्च- 2014 च्या परिक्षेचे प्रवेशपत्रे व प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्याचे वितरण  दि. 4 फेब्रुवारी रोजी साकळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत  येथील जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला या केंद्रावर वितरीत  करण्यात येणार आहे.
     तरी संबधितांनी आपला प्रतिनिधी अधिकार पत्रासह वितरण केंद्रावर पाठवून परीक्षेचे साहित्य घेवून जावे, असे आवाहन  मंडळाच्या लातूर विभागीय सचिवांनी केले आहे.                                               
 
Top