नळदुर्ग :- मैलारपूर (नळदुर्ग) कडे जाणार्या भाविकास बसने पाठीमागून जोराची धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अणदूर बसस्थानकासमोर घडली.
तुकाराम मिटकरी (वय 45, रा. अणदूर) असे अपघात मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे. तुकाराम मिटकरी हे खंडोबाचे दंडवत घेऊन मैलारपूर (नळदुर्ग) च्या दिशेने जात होते. आंध्रप्रदेश महामंडळाच्या बस (क्र. एपी 23 झेड 0034) च्या चालकाने निष्काळजीपणे बस चालवून मिटकरी यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये मिटकरी यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संभा हगलगुंडे यांच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.