उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, विधीज्ञ, पक्षकार आणि सर्व सबंधित विभाग प्रमुख, बँक व्यवस्थापन आदिंना सूचित करण्यात येते की, येत्या 12एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून यात सर्व प्रकारच्या न्यायप्रविष्ठ आणि वादपूर्व प्रकरणाचे एक दिवशीय राष्ट्रीय लोक-अदालत आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रमुख जिल न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधीज्ञ सेवा प्राधिकरणचे सुरेंद्र तावडे यांनी दिली.