उस्मानाबाद :- हरभरा पिकावरील घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांनी या अळीच्या नियंत्रणासाठी इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के, 0.50 मिली किंवा इमामेक्टीन बँझोएट 5 टक्के 0.2 ग्राम प्रति एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. अळया हाताने वेचून नष्ट कराव्यात. घाटे अळीसाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत तसेच पक्षीथांबे प्रति हेक्टर 50 उभारुन घाटेअळीचा नायनाट करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, भूम यांनी केले आहे.
किड नियंत्रणासाठी सल्ला महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या महाॲग्री या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. हा सल्ला मोबाईल संदेशाव्दारे शेतकऱ्यांना दर गुरुवारी व सोमवारी कळविण्यात येईल,असेही पत्रकात नमुद करण्यात आले आहे.