उस्मानाबाद :- जिल्हयातील माजी सैनिकाना सूचित करण्यात येते की, रेल्वे विभाग पुणेतर्फे माजी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिकानी या भरतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन मेजर ( नि). सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यानी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी 18 ते 25 जानेवारी,2014 या कालावधीत प्रसिध्द झालेला केंद्रीय रोजगार समाचारचा अंक पहावा,असे कळविण्यात आले आहे.