उस्मानाबाद -: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे राज्य माध्यमिक शिक्षा अभियानातंर्गत 9 वीसाठी संपादणूक प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. या प्रशिक्षणात इंग्रजी, मराठी व गणित या तीन विषयांचा समावेश होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ.कमलादेवी आवटे यांनी केले तर समन्वयक जी.व्ही.पौळ, साधन व्यक्ती सी.एस.साळूंके, एम.पी.वाघमारे व त्रिपाटी, मराठी विषयाचे प्रशिक्षण वर्गासाठी समन्वयक श्रीमती व्ही.व्ही.बनसोडे, तर साधन व्यक्ती म्हणून शेख जब्बार, के.डी.पवार आणि श्री.एस.एस.जळकोटे तर गणित विषयाच्या प्रशिक्षण वर्गासाठी श्रीमती जी.एस.मेनकुदळे यांनी तर साधन व्यक्ती म्हणून श्री.किशोर तुकाराम जाधव, अण्णाराव सुरवसे,भारत डिकले यांनी काम पाहिले. या प्रशिक्षण वर्गासाठी जिल्हाभरातून 156 प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.