उस्मानाबाद -: जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या केंद्रसंचालकांना कळविण्यात येते की, माध्यमिक शालांत परीक्षा मार्च-2014 परीक्षेसाठी केंद्रसंचालकाची बैठक दि. 15 रोजी दुपारी 12-30 वाजता श्रीपतराव भोसले हायस्कूल,उस्मानाबाद येथे आयोजित केली आहे. तरी सर्व परीक्षा केंद्रचालकांनी बैठकीस उपस्थित रहावे, याची  सर्व केंद्रसंचालकांनी नोंद घ्यावी,असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, लातूर यांनी कळविले आहे.
 
Top