उस्मानाबाद -: स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील 18 ते 35 वयोगटातील पुरुषांसाठी दि.12 फेब्रुवारी ते 13 मार्च या 30 दिवसाच्या कालावधीसाठी घरगुती  इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती या प्रशिक्षणाचे आयोजन राजे कॉम्प्लेक्स, 3 रा मजला,औरंगाबाद रोड, उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे.
       या प्रशिक्षणामध्ये इलेक्ट्रिक उपकरणांची ओळख, खबरदारीचे उपाय व सावधानता, प्रथमोपचार, पावर स्टेशनचे प्रकार, दुरुस्तीची उपकरणे, व्होलटेजची व्याख्या व चाचणी पध्दत, विविध प्रकारचे स्वीच व सोकेट, मल्ती मीटरचा वापर, मीटर बोर्ड आलेख, सिंगल रुम वायरिंग, स्टेअर केस, गोडावून, हॉस्पिटल व लौज वायरिंग, चुंबक व चुंबकाचे प्रकार इलेक्ट्रिक मोटार मधील पोल्स व आरपीएम पध्दत, सिलिंग पंखा व वायडिंग, सर्वीसींग, मेंटेनन्स, रुम हिटर व स्टॅबीलायझर, गिझर दुरुस्ती, मिक्सर ग्राईडर इत्यादी प्रशिक्षकामार्फत थेअरी व प्रॅक्टीकल प्रोजेक्टरद्वारे शिकवली जाणार आहेत. या प्रशिक्षण कालावधीत स्टेशनरी व जेवणाची व राहण्याची व्यवस्था संस्थेमार्फत विनामुल्य करण्यात आली आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर बँकेमार्फत कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी ईच्छूक पुरुषांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवराज गवळी यांनी केले आहे.
      प्रवेशासाठी  ग्रामसेवकाचा दारिद्रयरेषेखालील असल्याचा दाखला, रेशन कार्ड किंवा रहिवाशी दाखला, वय व शैक्षणिक पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट/मार्कलिस्ट, आयडेटीटी साईज 4 फोटो इत्यादी कागदपत्रासह व्यक्तीश: भेटावे अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 7875443799 वर संपर्क करण्याचे आवाहन संचालक स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top