उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्यात वितरित करावयाच्या ऑटोरिक्षा परवान्यांच्या संख्येत तीनशेहून वाढ करण्यात आली असून आता एक हजार आठ एवढे परवाने वितरित करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. इच्छुक ऑटोरिक्षा बॅजधारकांनी वाढलेल्या परवान्यांची संख्या विचारात घेऊन 15 फेब्रुवारी, 2014 या अंतिम दिनांकापूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात 1 लाख 30 हजार अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल झाले आहेत
 
Top