उस्मानाबाद -: राज्यातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या नवीन माध्यमिक शाळांना विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्याबाबत शासनाने बृहत आराखडयानुसार निश्चित केलेल्या ठिकाणासाठी नोंदणीकृत शैक्षणिक संस्थाकडून 14 जून,2012,25 जुलै,2012 आणि 22 ऑगस्ट,2012 च्या शासननिर्णयानुसार अर्ज मागविण्यात आले होते. सदर प्राप्त अर्जांची छाननी जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात आली आहे. या समितीच्या प्राथमिक अहवाला संदर्भात हरकती/आक्षेप/सूचना दि.17 फेब्रुवारी,2014 पर्यंत संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे नोंदविण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
सदर समितीचा प्राथमिक अहवाल www.mahdoesecondary.com या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच त्याच्या प्रती जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.
प्राथमिक अहवाला संदर्भात ज्यांचे हरकती/आक्षेप/सूचना असतील त्यांनी जिल्हास्तरीय छाननी समितीचे अध्यक्ष/सदस्य सचिव यांना समक्ष भेटून दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना द्याव्यात.विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती/आक्षेप/सूचनांचा विचारात घेतल्या जाणार नाहीत तसेच यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.