उस्मानाबाद -: सन 2013-14 या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण व परीक्षी फी  या शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी,2014 असून मागील शैक्षणिक वर्ष 2012-13 एकूण 20 हजार 360 विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला आहे.
       तरी अनुसूचित जाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गातील भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी व परीक्षा फी या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मुदतीत आनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांनी केले आहे.
       तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती सन 2013-14 या शैक्षणिक वर्षापासून ई-स्कॉलरशिप योजनेत समावेश करण्यात आलेला असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील. सदर बाब संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दयावी व विद्यार्थ्यांस अडचणी आल्यास संबंधितानी त्वरीत मदत करावी. जर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज न भरल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून  वंचित राहिल्यास याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्यावर राहीत,असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
      ऑनलाईन शिष्यवृत्ती बाबत अधिक माहितीसाठी E.Scholarship/Maha.E.Scholarship या वेबसाईट वर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज  भरताना इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा आसन क्रमांक आणि उत्तीर्ण झाल्याचे वर्ष ही माहिती सोबत ठेवणे आवश्यक आहे.
     या संदर्भात काहीही अडचणी असल्यास सहायक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद या कार्यालयाशी संपर्क साधावा.
 
Top