नळदुर्ग :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभाग मागासवर्गीय सेलची तालुकास्तरीय बैठक येथील शासकीय विश्रामगृहात रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.
    या बैठकीत शासनाने सुरु केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची उस्मानाबाद जिल्हयात पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या पुढाकारातून तातडीची अंमलबजावणी करण्यात आल्याबददल सर्व प्रथम ना. चव्हाण यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच मागासवर्गीयासाठी राबविण्यात येणा-या रमाई घरकुल योजनेसाठी दारिद्ररेषेची अट रदद करावी, नौकरदार वर्ग वगळता मागासवर्गीयांच्या कुटूंबाना सरसकट दारिद्र रेषेखालील यादीत नाव समाविष्ट करावे आदीसह विविध महत्वपूर्ण ठराव घेण्यात आले.
    यावेळी काँग्रेस मागासवर्गीय सेलच्या नळदुर्ग शहराध्यक्षपदी अजय बागडे याची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र कांबळे, धनराज गायकवाड आदीची निवड करण्यात आली. तर तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी बाळासाहेब ढवळे, सम्राट चंदनशिवे, सत्यवान भोवाळ तर तालुका सचिवपदी राम गायकवाड, दत्तात्रय धनशेटटी, सहसचिवपदी दत्ता गायकवाड, महादेव मोटे, विश्वनाथ वाघमारे आदी पदाधिका-यांची निवड करण्यात आली. या बैठकीस तालुकाध्यक्ष सिकंदर अंगुले पं.स.चे उपसभापती प्रकाश चव्हाण, मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश बनसोडे, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दादासाहेब चौधरी, नळदुर्ग शहर युवक अध्यक्ष बसवराज धरणे, विजय गायकवाड, कुलस्वामिनी सुत गिरणीचे संचालक सुधाकर सगट, शिवाजी बनसोडे, भैरवनाथ कानडे, शरणाप्पा कबाडे आदीजण उपस्थित होते.
 
Top