बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार असोसिएशने सदस्यांची बैठक बोलावून न्यायालयीन प्रकरणाच्या कागदपत्रांवर विना परवानगी सह्या करणेकामी दोषी असलेल्या न्यायालयीन लिपीकासह दोन विकलावर प्रोफेशनल मिस कन्डक्टची कारवाईकरावी अशी मागणी ॲड.गणपत साखरे यांनी बार असोसिएशनकडे केली आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी, येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात भालचंद्र साखरे यांच्याविरुध्द एका दाव्याचे प्रकरण सुरु आहे. सदरच्या प्रकरणातील सामनेवालाचे वकील ॲड. गव्हाणे यांचे मार्फत पी.आर.करजंकर यांना प्रकरण चालविण्यास देण्यात आले. सदरच्या प्रकरणावर न्यायालयाच्या परवानगी शिवाय कनिष्ठ लिपीक संदिप झाडबुके यांच्या समक्ष करजंकर यांनी संगनमताने स्वाक्षरी केली. सदरची स्वाक्षरी ही फसवणूकीसाठी खोटे रेकॉर्ड तयार करुन पुराव्यासाठी वापरण्याच्या हेतूने केलेली आहे व या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी बार असोसिसएशने सदस्यांची बैठक घ्यावी आणि भालचंद्र साखरे, लिपीक संदिप झाडबुके, ॲड.करजंकर, ॲड.गव्हाणे यांची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ॲड्.गणपत साखरे यांनी केली आहे.
     न्यायदानासारख्या पवित्र ठकाणी सर्वसामान्यांचा प्रचंड विश्वास आहे. सदरच्या प्रकरणावरुन कायद्याचे रक्षण होत असलेल्या ठिकाणी होणार्‍या चुकांवर दुर्लक्ष केल्यास न्याय व्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे तसेच त्याची सवय लागून चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे.
     साखरे विरुध्द साखरे त्यांच्यातील सुरु असलेल्या खटल्याचा निकाल प्रकरण पाहून न्यायालयाकडून जो लागायचा तो लागेल ही परंतु त्या अगोदरच न्यायासाठी सुरु असलेल्या प्रकरणात आणखी न्यायासाठी झगडणे सुरु झाले आहे. कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्ती आणि कायद्याचे रक्षण करणार्‍या व्यक्तीच कायद्याची पायमल्ली करु लागल्या तर सर्वसामान्यांना कायद्याचं बोला म्हणणार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.  कायदा ऐवजी फायदा पाहण्याचे प्रमाण वाढत आहे.
 
Top