उस्मानाबाद :- केंद्र व राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत नागपूर येथे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त दि. 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कृषि वसंत प्रदर्शन-2014 आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैद्यकिय शिक्षण व फलोत्पादनमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, राज्यमंत्री कृषी व पशुसंवर्धन संजय सावकारे, यांनी करुन सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
