उस्मानाबाद : येथील जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांची पुणे येथे यशदा या संस्थेमध्ये उपसंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
डॉ. के.एम. नागरगोजे यांनी 29 जून 2012 रोजी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली होती. आपल्या 20 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून राबविलेला रिजार्च शॉफ्टचा उपक्रम पाणीपातळी वाढविण्यासाठी मोलाचा ठरला. हा उपक्रम 200 गावांमध्ये राबविण्यात आला. तसेच पाणीसाठय़ातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी फॅटीक अँसीडचे आच्छादन अंथरण्याचा निर्णयही मोलाचा ठरला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष म्हणून तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी अभिषेक पूजा कमी करून, केवळ दुधाचा अभिषेक घालण्याचा धोरणात्मक व धाडसी निर्णयही डॉ. नागरगोजे यांनी घेतला. त्यांच्या कारकीर्दीतील या जमेच्या बाजू असल्या तरी या कालावधीत जिल्हा प्रशासनावर मात्र त्यांची पकड राहिली नाही. त्यामुळे समाजाभिमुख प्रशासन ही निर्माण झालेली ओळख धुसर होऊन अधिकारी राज दिसून आले. त्याचबरोबर नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येस घडलेली चेंगराचेंगरी, मंदिर संस्थान तसेच मंदिरातील बिघडलेली शिस्त यावरही त्यांना नियंत्रण मिळविता आले नाही.