उस्मानाबाद :- राज्य साधन केंद्र, पुणे यांच्यावतीने साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद व कळंब या दोन तालुक्यात आंतर व्यक्ति संवाद अभियान कार्यक्रमांतर्गत मतदान साक्षरता, कायदा साक्षरता, आर्थिक साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन व साक्षर भारत या विषयावर आधारीत उदबोधन वर्ग दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला, शहर पोलीस स्टेशन जवळ, उस्मानाबाद व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथे आयोजित करण्यात आले आहे.
या उदबोधन वर्गास त्या त्या तालुक्यातील सरपंचांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (नि. शि.) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.
या उदबोधन वर्गास त्या त्या तालुक्यातील सरपंचांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (नि. शि.) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.