उस्मानाबाद :- झी-24 तास कृषि सन्मान-2014  पुरस्कार वितरण येत्या 21 फेब्रुवारी,2014 रोजी गणेश कला क्रिडा मंच, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यास शेतकऱ्यांना सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, (आत्मा), कृषि विभाग, उस्मानाबाद यांनी केले आहे. प्रवेशाचे विहीत नमुन्यातील  अर्ज जिल्ह्यातील प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, कृषि विज्ञान केंद्र आणि तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयत उपलब्ध असून  आहेत.
          इच्छुक शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज प्राप्त करुन पुर्णपणे भरलेले अर्ज 14 फेब्रुवारीपर्यंत पुणे येथील वरील पतयावर पाठवावे, असे आवाहन  प्रकल्प संचालक, आत्मा कृषि विभाग, उस्मानाबाद यांनी केले आहे. 
 
Top