उस्मानाबाद  :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध प्रवर्गात उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. भरतीची जाहिरात व सूचना www.mahast.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांने ऑनलाइन पध्दतीने आपल्या अर्जाची नोंदणी 15 फेब्रुवारीपर्यंत करावी.  ही भरती प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्तेनुसार होणार असल्याने उमेदवारांने कोणत्याही प्रलोभनास बळी पडु नये व कोणाच्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी  केले आहे.
    उमेदवारांनी विविध पदासाठी विहीत केलेली शैक्षणिक अर्हता व इतर अटीची पुर्तता 27 जानेवारी 2014 रोजी करणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीसोबत जोडला असून उमेदवारांनी त्यानुसार परीक्षेची तयारी करावी. चालक कनिष्ठ पदासाठी वाहन चालन चाचणीत  मिळालेल्या गुणांना 60 टक्के भारांक (वेटेज) व लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांना 40 टक्के भरांक (वेटेज) देवून मुलाखती न घेता उमदेवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
    प्रमुख कारागिर (कनिष्ठ) कारागीर क (कनिष्ठ) व सहायक (कनिष्ठ) या पदांसाठी मुलाखत न घेता 100 टक्के भारांक (वेटेज) लेखी परीक्षेतील गुणांना देवून गुणवत्तेनुसार निवड  करण्यात येणार आहे.
    इतर अधिकारी व पर्यवेक्षीय पदासांठी 90 टक्के भरांक (वेटेज) लेखी परीक्षेतील गुणांना व 10 टक्के भारांक (वेटेज) मुलाखतीमधील कामगिरीस देवून उमेदवारांची गुणवत्तेनुार निवड करण्यात येणार आहे.
    उमेदवारांनी निवडी संदर्भात कोणताही दबाव आणण्याचा अथवा इतरांमार्फत हस्तक्षेप प्रयत्न केल्यास किंवा कोणत्याही अनुचित प्रथेचा अवलंब केल्यास अशा उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करुन त्यांच्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल. उमेदवारांनी कोणास खेाटी माहिती देवून दिशाभूल करीत असल्यास  विभाग नियंत्रक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबादशी दुरध्वनी क्र 02472-222216 वर संपर्क साधण्याचे आवाहन विभाग नियंत्रक, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top