उस्मानाबाद :- नागपूर येथे राष्ट्रीय पातळीवरील आयोजित कृषि वसंत प्रदर्शनाचा अभ्यास व लाभ घेण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील 352 शेतकरी विशेष आठ बस गाडयातून रवाना झाले आहेत. या बसगाडयांना आमदार राणाजगजितसिंह पाटील, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जि.प.चे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव सरडे, सतीष खडके व  प्रगतशिल शेतकऱ्यांच्या गाड्यास हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.       
    याप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक व्ही. एम. हिरेमठ, प्रकल्प संचालक एस. आर. चोले, मंडळ कृषि अधिकारी जी. व्ही. सस्ते, ए. पी. चिक्षे व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.  सदर कार्यक्‌रमाचे  नियोजन तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एस. पी. जाधव व ए. डी. चव्हाण,कृषि सहायक व्ही. डी. लोंडे  तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी पार पाडले.                                              
 
Top