बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील सोमाणी हॉस्पिटल येथे उपचारासाठी गेलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक डाके यांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
    मंगळवारी सकाळी डाके हे डॉ.सोमाणी यांच्याकडे तपासणी साठीगेले असता सदरचा प्रकार घडला. तपासणी करुन घेण्यासाठी मोबाईल टेबलवर ठेवल्यानंतर अज्ञात चोरट्याने हात साफ करुन पलायन केले. सदरच्या घटनेची नोंद बार्शी पोलिसांत करण्यात आली आहे. शनिवारी दि.८ रोजी येथील भाजीमंडईमध्ये दराडे यांचा मोबाईल देखिल हातोहात गेल्याने बार्शी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजी मंडईतील गोंधळानंतर जमावाने एक महिला व दोन पुरुष अशा तीन संशयीतांना बार्शी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सदरच्या संशयीतांनी दराडे यांचा मोबाईल घेऊन त्यांच्या साथीदारांकडे दिला व ते पळून गेल्याचेही जमावातील एकाने म्हटले होते. बार्शी पोलिसांना संशयीतांकडून मोबाईल चोरीबाबत अधिक माहिती घेण्यात फारसे यश मिळाले नाही. परंतु मोबाईल , दागीने इत्यादी कोणत्याही मौलवान वस्तू मिळेल ते घेऊन पळून जाणारी टोळी बार्शीत कार्यरत होती व बार्शी पोलिसांना गुन्हेगार सापडत नाहीत हे विविध गुन्ह्यांवरुन दिसून येत आहे.
 
Top