बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : संवेदनशील असलेल्या बार्शीवर पोलिसांनी पाळत ठेवत रास्तारोको आंदोलन होण्यापूर्वीच ७ जणांना ताब्यात घेतल्याने टोलचे बार्शीतील मनसेचे आंदोलन शांत झाले.
    आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बार्शी लातूर मार्गावरील कुसळंब टोलनाका व बार्शी सोलापूर मार्गावरील भोगावती नदीवरील टोलनाक्यावर बार्शी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले होते. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिस उपाधिक्षक रोहिदास पवार, पोलिस निरीक्षक सालार चाऊस, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक डाके, स.पो.नि.यादव ,स.पो.नि.शरद मेमाणे यांसह अधिकारी व कर्मचारी तसेच जलद कृतिदलाचे जवान यांनी बंदोबस्त ठेवला. सी.आय.डी.च्या पथकानेही बार्शीवर लक्ष केंद्रीत करुन बार्शीला भेट दिली. आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या जादा असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
 
Top