बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : दलित समजाच्या विविध समस्या व मागण्यांसाठी दलित महासंघ हलगीनाद आंदोलन करणार असून जिल्हा पोलिस प्रमुख तसेच पोलिस निरीक्षकांना मटका चिठ्ठ्यांची माळ, जुगारातील पत्त्यांच्या माळा, दारुच्या बाटल्यांची माळ घालून निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे तहसिलदारांना दिलेल्या तक्रारी वजा निवेदनात म्हटले आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात स्मशानभूमीवरील अतिक्रमणे, रस्ते लाईट पाण्याची सोय, मागासवर्गीय शेतकर्यांच्या विहीरीचे अनुदानात वाढ, रमाई घरकुल योजनेतील जाचक अट रद्द करणे, दारिद्रय रेषेखालील व्यक्तींची यादी जाहीर करावी, पिवळ्या शिधापत्रिका, गायरान जमीनी मिळाव्या, शासकिय धानायाचा अपहार, जुगार, मटका, राजरोसपणे विनापरवाना दारुविक्री, अवैध प्रवासी वाहतूक, संजय गांधी योजनेतील प्रलंबीत प्रकरणे इत्यादी मागण्या असून योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास यापुढे अधिक आक्रमकपणे आंदोलन छेडण्यात येईल असेही म्हटले आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षकांना या निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या आहेत.