बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सहाय्यक पोलिस निरीक्षक हारुण शेख यांचे वाहन असल्याचे सांगून बनावट कागदपत्राने युवराज उपळाईकर व सचिन लांडगे यांनी शिवाजी देवकते यांना विकलेल्या पोलिस वाहन व्यवहारातील फसवणुकीचा गुन्हा बार्शी पोलिसांत दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी शिवाजी लिंबाजी देवकते वय ७२ रा.कुर्डूवाडी रोड,बार्शी यांनी शेतीच्या कामासाठी जुने चारचाकी जिप्सी मारुती वाहन क्रमांक एम.एच.१२, डब्ल्यू ४९२७ हे वाहन युवराज उपळाईकर यांच्याकडून खरेदी केले. दि.२८ मार्च २०१३ ते १ जुलै २०१३ दरम्यान देवकते यांचे घरी व उपळाईकर यांच्या दुकानात सदरच्या वाहनाबाबत खरेदी व्यवहारांची बोलणी व व्यवहार ठरला. सचिन लांडगे यांनी उपळाईकर यांच्या संगनमताने सदरच्या वाहनाची विक्री करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करुन सह्या केल्या. सदरचे जुने पोलिस वाहन खरेदी केल्यानंतर रक्कम घेऊनही कागदपत्र दिले नाही व कागदपत्रात अफरातफर करुन फसवणूक केली व दमदाटी केल्याची फिर्याद शिवाजी लिंबाजी देवकते यांनी बार्शी न्यायालयात दाखल केली. तत्पूर्वी पोलिसांना लेखी तक्रारी देऊनही चौकशी करुन गुन्हा दाखल अथवा आरोपींवर कारवाई झाली नसल्याने न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानंतर चौकशी करुन युवराज अशोक उपळाईकर रा.बार्शी आणि सचिन गणपत लांडगे रा.कुर्डूवाडी यांच्याविरुध्द भा.दं.वि.४२०, ४०६, ४६४, ४६७, ४६८, ४७१, ५०४, ५०६ नुसार बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहा.पो.निरीक्षक अतुल भोस हे करीत आहेत.