सोलापूर :- विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. 1 सोलापूर या समितीकडे दि. 14 डिसेंबर 2013 पर्यंत शैक्षणिक, सेवा व निवडणूकविषयक जी प्रकरणे प्राप्त झाली होती त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामधून वैध ठरविलेल्या प्रकरणांची संख्या शैक्षणिक 4369 सेवाविषयक 5508 व निवडणूकीची 20 अशी एकूण 9897 प्रकरणे वैध असून त्या प्रकरणांची वैधता प्रमाणपत्रे तयार करण्यात आलेली आहेत. सदर वैधता प्रमाणपत्रांचे वाटप दि. 9 फेब्रुवारी ते दि. 11 फेब्रुवारी 2014 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सांस्कृतिक भवनामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. तयार वैधता प्रमाणपत्रांची लॉट नंबर व वैधता प्रमाणपत्र क्रमांकाची माहिती www.barti.cdac.in या वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहे.
    सदर वेबसाईटवरुन कर्मचा-यांनी लॉट नंबर व वैधता प्रमाणपत्र क्रमांकाची माहिती करुन घ्यावी. त्यानुसार संबंधीत कर्मचारी यांनी सदरचे मूळ वैधता प्रमाणपत्र व मुळ जातीचा दाखला (जोडला असल्यास) वरील कालावधीत घेऊन जावयाचे आहे. संबंधीत उमेदवारांशिवाय अन्य व्यक्तीकडे वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. संबंधीत उमेदवारांनी स्वत:चे मुळ ओळखपत्र सोबत आणावे. असे आवाहन समिती कार्यालयामार्फत करण्यात आलेले आहे.
 
Top