उस्मानाबाद :- जिल्ह्यात हत्तीरोगाला प्रतिबंध करण्यासाठी दि. 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान एक दिवशीय सामुदायिक औषधोपचार मोहिमेत गोळया खाऊ घालण्याचा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या हत्तीरोगाच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी 100 टक्के डी. ई. सी व ऍ़ल्बेडझॉल गोळया खाऊन प्रतिसाद देण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या त्यांच्या दालनात आयोजित एक दिवशीय सामुदायीक औषधोपचार मोहिमेच्या बैठकीत केले. यावेळी जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. रईस हाश्मी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. एच. माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) विभागाचे श्री. शहापूरकर, प्राथमिक शिक्षण विभागाचे श्री.जगदाळे, समाज कल्याण विभागाचे एम. बी. राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत, सहायक नानासाहेब बोरकर आदिंची उपस्थिती होती.
या मोहिमेची सुरुवात अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी स्वत: गोळया खाऊन केली. ही मोहिम ग्रामीण भागात 10 ते 12 फेब्रुवारी,2014 (3 दिवस) तर शहरी भागात दि. 10 ते 14 फेब्रुवारी,2014 (5 दिवस) राबविण्यात येईल. जिल्ह्यातील हत्तीरोग निवारणासाठी डी. ई. सी व ऍ़ल्बेडझॉल औषधीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून जिल्ह्यात 13 लाख 91 हजार 544 तर शहरी भागात 3 लाख 22 हजार 735 अशी एकूण 17 लाख 14 हजार 279 आहे. या मोहिमेचा मुकाबला करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी, सर्व शासकीय रुग्णालय, तहसील कार्यालय, नगर पालिका, पंचायती समिती यांच्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात पर्यवेक्षकांच्या नेमणूका केल्या आहेत.
ग्रामीण भागात 1 हजार 855 स्वयंसेवक कर्मचारी, 93 पर्यवेक्षक तर शहरी भागात 215 स्वयंसेवक कर्मचारी , 11 पर्यवेक्षक,अंगणकवाडी, आशा स्वयंसेवक या मोहिमेत घरोघरी भेटी देऊन गोळया खाऊ घाण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
हत्तीरोग रुग्ण शोध मोहिमेतील सर्वेक्षाणानुसार जिल्ह्यात हत्तीपाय व अंडवृध्दीचे 1 हजार 611 रुग्ण आहेत. या अंडवृध्दी शस्त्रक्रिया झालेले रुग्णांची संख्या 50 आहे. या रोगाची लागण व प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीपासून होतो. तो डास चावल्यावर माणसे या रोगाला बळी पडतात. या औषधोपचार मोहिमेत 2 ते 5, 6 ते 14 व 15 व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांना गोळया दिल्या जातील. गरोदर महिला, आजारी व्यक्ती, दोन वर्षाखालील बालके यांना या मोहिमेतून वगळण्यात आले आहे.