उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण चार दिवस उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत  असून  त्यांचा दौऱ्याचा  कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
    शनिवार, दि. 8 फेब्रुवारी, 2014  रोजी सायंकाळी 6-30 वाजता (अणदूर, ता. तुळजापूर) येथे आगमन व मुक्काम. रविवार दि. 9 रोजी सकाळी 9 वा. अणदूरहून शासकीय वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी 9-30 वा. शासकीय विश्रामागृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. स. 9-35 वा. नागपूर येथे आयेाजित राष्ट्रीय पातळीवरील कृषि वसंत प्रदर्शनास प्रस्थान करणाऱ्यां शेतकऱ्यांना शुभेच्छा (स्थळ- लातूर रोड-तुळजापूर), स. 9-40 वा. तुळजापूरहून औसा-लामजना मार्ग निलंगा, ( जि. लातूरकडे प्रयाण). स. 11-30 वा. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री यांचा 83 व्या वाढ दिवसानिमित्त आयोजित निष्ठावंत नेतृत्व या गौरव ग्रंथप्रकाशन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ- महाराष्ट्र शिक्षण समिती संकुल निलंगा, जि. लातूर, दु. 2 वा. निलंगाहून  तुळजापूरकडे प्रयाण. दु. 3-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव.  सोईनुसार अणदूरकडे प्रयाण आगमन, राखीव व मुक्काम.
         सोमवार, दि. 10 रोजी स. 9-30 वा. अणदूरहून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण, स.10 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे अगामन व राखीव. स. 10-10 वा. तुळजापूर येथून शासकीय वाहनाने मौ. पाटोदा, (ता. जि.उस्मानाबादकडे प्रयाण), स.10-30 वा. मौ. पाटोदा येथील सांस्कृतिक सभागृहाचे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दु. 11-30 वा. मौ. भंडारी येथील रस्ता भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दु. 12-30 वा. मौ. धुत्ता येथील नवीन रस्त्याच्या लोकर्पण कार्यक्रमास उपस्थिती. दु. 2 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व रखीव.  सायं. 4-30 वा. उस्मानाबादहून मौ. कोंड, ता. जि. उस्मानाबादकडे प्रयाण.  सायं. 5 वा. मौ. कोंड येथील नवीन व्यायामशाळा उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहून सायं 6-30 वा. मौ. मेडसिंगा येथे काँग्रेस पक्षाच्या शाखेचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती.  सोईनूसार अणदूर (ता. तुळजापूरकडे) प्रयाण, आगमन , राखीव व मुक्काम.
       मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10-30 वा. अणदूर येथून शासकीय वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण.  स. 11 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव.  दु. 2-30 वा. तुळजापूर येथून शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण. दु.  3 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4-30 वा. कै. शिवाजीराव पाटील बाभळगावर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभास उपस्थिती- स्थळ- बालाघाट शिक्षण संस्था, नळदुर्ग, ( ता. तुळजापूर ), सायं. 6 वा. अणदूर येथे राखीव. सायं 7 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण करतील.
 
Top