उमरगा (लक्ष्मण पवार) :- भुसणी (ता. उमरगा) येथील एका शेतक-याने अत्याधुनिक पध्दतीच्या सहाययाने 5 एकर कोरडवाहू शेतजमिनीत पाच फुट उंचीचे करडईचे पीक घेत 50 ते 60 क्विंटलचे उत्पादन घेत तालुक्यातील शेतक-यांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.
    उमरगा तालुक्यातील भुसणी येथील प्रगत शेतकरी धुळाप्पा
शिवबसप्पा बिराजदार व त्यांचा मुलगा सुभाष या दोघांनी आधुनिक शेती पध्दतीचा अवलंब करीत करडईच्या सरपन 101 या जातीची पेरणी केली. त्याला वेळेवर सेंद्रीय खत, रासायनिक खताबरोबर वेळेवर औषधांची फवारणी केली. विशेष म्हणजे करडईत तेलाचे प्रमाणे काढावे, म्हणून बोराण औषधाची फवारणी केली व एकझाड साडेचार ते पाच फुट उंचीचे आणले. एका झाडाला 25 ते 30 फुटवे आहेत. एका बोंडात 70 ते 80 बिया सदयस्थितीत तयार झालेल्या आहेत. एका एकरात 10 ते 12 क्विंटल उत्पादन असे पाच एकरात 50 ते 60 क्विंटल करडईचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. बाजारात सदयस्थितीत अडीच ते तीन लाखाचे उत्पादन होणार आहे. बिराजदार यांना 30 एकर शेती आहे. बिराजदार यांना 30 एकर शेती आहे. पैकी पाच एकर कोरडवाहू शेतात तालुका कृषी अधिकारी एच.आर. गोरे, मंडळ कृषी अधिकारी एन.एस. पाटील, कृषी पर्यवेक्षक जी.व्ही. कांबळे, कृषी सहाययक डी.बी. जाधव, एन.एस. जोशी यांच्यासह माजी सरपंच धनराज हिरमुखे, मुरुमचे मनिष मुदकण्णा, भुसणीचे गोविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने करडई जोमात वाढली आहे. शेतकरी बिराजदार यांचे करडईचे फड चांगले आणल्याबददल करडईचे पीक पाहण्यासाठी तालुक्यातील शेतक-यांनी गर्दी केली आहे.
 
Top