उमरगा (लक्ष्मण पवार) :- उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन दिवसीय बीटस्तरीय सांस्कृतीक महोत्सव गुरूवार दि. 6 रोजी संपन्न झाला. 
        यावेळी आयोजित सांस्कृतीक महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेकूरवाडीचे सरपंच सौ. गंगाबाई कांबळे या होत्या. तर प्रमुख पाहूणे म्हणून कॉग्रेसचे रामकृष्णपंत खरोसकेर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, पंचायत समिती सभापती सौ. अक्षरबाई सोनवणे, उपसभापती बाबा उर्फ अशरफ निहाल काझी, पंचायत समिती सदस्य गुरूलिंग वाकडे, सौ. संध्या टिकांबरे, सौ. रागिणी बिराजदार, सौ. रेखा कांबळे, सौ. तेजाबाई सुरवसे, पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पवार,पत्रकार अरूण हगवे, पत्रकार नसरोद्दीन फकीर महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, नानाराव भोसले, गटशिक्षण विस्तार अधिकारी सौ. एस.एम. राऊत, केंद्र प्रमुख अर्जून जाधव, आर.एस. सुरवसे, डी.सी. साळुंके, चंद्रहर्ष सुर्यवंशी, भास्कर चिट्टे, राम कांबळे यांच्यासह शिवगर्जना प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
    यावेळी बीटस्तरीय सांस्कृतीक महोत्सवात 31 शाळांचा सहभाग घेतला होता. पहिल्या दिवशी वैयक्तीक नृत्य कलाप्रकारात सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता. तर सामुहिक नृत्य कलाप्रकारात पहिली ते सातवी पर्यंतच्या 27 शाळांनी सहभाग घेऊन उत्कृष्ठ कला सादर केली. यावेळी सहभागी जकेकूरवाडी, कोराळ, येणेगूर, संभाजीनगर, कडदोरा, बलसूर, कदेर तांडा, येळी, भुसणी, समुद्राळ, रामपूर, कलदेव लिंबाळा, काटेवाडी, चिंचोली (भू), जकेकूर, औराद आदी शाळांनी देशभक्तीपर गीते, कव्वाली, देव-देवतांचा महिमा, पंढरीच्या विठठलाचा गजर, आई तुळजाभवानीचा गजर तर लहान गटात जकेकूरवाडीच्या शाळेने सादर केलेले रे मेरे वतन के लोगो, जकेकूरच्या भक्त पुंडलीक, भुसणीच्या जहाँडाल डालपर, कडदोराच्या धटींग नाच गाण्यांनी धम्माल उडविली. तर मोठया गटात भुसणीच्या शाळेने सादर केलेले मराठमोळं गाणं, समुद्राळच्या ललाटी भंडारं, कोराळच्या नंदकिशोरा या गाण्यांनी महोत्सवात रंग भरला.
    तत्पूर्वी मार्गदर्शन करताना पं.स. सभापती सौ. सोनवणे म्हणाल्या, पुढील वर्षी तालुकास्तरीय सांस्कृतीक क्रीडा महोत्सवासाठी एक लाख रुपयेचा तरतुद अनुदान जाहीर केले. तसेच नृत्य गुण संपन्न विदयार्थी व्हावेत, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व ग्रामीण भागातील विदयार्थी राज्य पातळीवर चमकावेत, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
    सामुहिक नृत्याच्या लहान गटात जि.प.प्रा.शाळा कडदोरा प्रथम क्रमांक, जि.प.प्रा.शाळा येणेगूर द्वितीय तर केंद्रीय शाळा बलसूरने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. तर मोठया गटात जि.प.प्रा.शाळा समुद्राळने प्रथम क्रमांक, जि.प.प्रा.शाळा कोराळने द्वितीय तर जि.प.प्रा.शाळा चिंचोली भुयारने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक साखरे, सुरेंद्र वाले, एस.व्ही. स्वामी यांनी केले. विशेष म्हणजे जि.प.प्रा.शाळेत प्रथमच दोन एलईडी प्रोजेक्टच्या माध्यमातून सांस्कृतीक महोत्सवाचा आनंद ग्रामवासियांनी लुटला.
 
Top