परभणी : शहरालगत जिंतूर रोडवरील कोतवाली पोलिस ठाण्याअंतर्गत जाम पोलिस चौकीच्या परिसरात भरदिवसा एका पोलिसाने दुस-या पोलिसांवर धारदार चाकूने सपासप वार केले. त्यात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. तशाच अवस्थेत त्यांनी रुग्णालय गाठले. परंतु उपचारादरम्यान अवघ्या ३५ मिनिटांत ते मृत्यू पावले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस तात्काळ गजाआड केले. नेहमीच इतरांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस क्षुल्लक कारणावरून सहका-याच्या जिवावर उठण्याचा हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे.
उरुसानिमित्त तैनात करण्यात आलेल्या जाम पोलीस चौकीच्या परिसरात गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी भर दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी गुन्हातील दुचाकी (क्र. एम.एच २२ के १४५५ आणि एम.एच २६ के ६८५२) वाहने होती. नानलपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस जमादार (ब.नं १००६) खंडेराय दिगंबर सोडगीर हे गणवेशासह बंदोबस्तासाठी येथे तैनात होते. त्यावेळी अचानक तेथे आलेल्या पोलिस मुख्यालयातील पोलिस नायक आर. एफ. फारोकी यांनी त्याच्यावर जिवे मारण्याच्या इराद्याने छातीत दोन्ही बाजूला चाकूने सपासप वार केले. त्यामुळे सोडगीर रक्ताच्या थारोळ्यात पडले. ही घटना घडल्यानंतर पोलिस कर्मचारी यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यावेळी रक्तबंबाळ अवस्थेत सोडगीर यांनी एका ऑटोचालकाच्या मदतीने दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून घेतले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी पोलिस जमादार सोडगीर यांस मृत घोषित केले.
यावेळी माहिती देताना डॉ. माले म्हणाले की, रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या जखमी सोडगीर यांच्यावर अतिदक्षता विभागातील डॉ. काजे, डॉ. काझी, डॉ. साळवे आणि डॉ. चौधरी यांनी उपचार करून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. परंतु सोडीगीर यांच्या छातीच्या दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचा मार लागला होता. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घटनास्थळास परभणीचे पोलिस उपअधीक्षक प्रणय अशोक यांनी भेट दिली. ते बराच वेळ जिल्हा सामान्य रुग्णालयात तळ ठोकून होते. या प्रकरणावर कोणत्याही प्रकारचे भाष्य करणे त्यांनी टाळले. आरोपी फारोकी यास अटक करण्यात आली आहे.