सुमन रावत
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुमन रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जि. प. मध्ये प्रशासकीय अधिका-यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. तसेच शासकीय विश्रामगृहावरही अनेक राजकीय पक्षाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
    जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरदास यांच्याकडून नव्याने रूजु झालेल्या सुमन रावत यांनी स्विकारल्या. प्रत्यक्ष प्रशासकीय कामाची सुरूवात दि. ७ फेब्रुवारीला केली जाणार आहे.
    उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे घेण्यासाठी सुमन रावत यांचे आगमन होताच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिका-यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागाच्या वतीने सुमन रावत यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरदास, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब वानखेडे, के. डी. बोणे, डॉ. हाश्मी, मनियार, सांगळे, थोरात सर्व विभागाचे विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे आदिंची उपस्थिती होती.
    आज शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी पासुन आपल्या पदाची सुत्रे घेऊन कामाला सुरूवात करणार असल्याची माहिती रावत यांनी स्वागताला उत्तर देताना दिली. तसे आपल्या दबंग स्टाईलने म्हणाल्या की, ‘अब मै आ गई हूँ... सब कुछ ठिक हो जायेगा’ असा आशावादही जिल्हावासीयांना वेगळ्या ढंगात दिला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराला व भ्रष्टाचाराला वैतागुन गेलेल्या जनतेला एक प्रकारे नवा आशावाद निर्माण झाला आहे.
 
Top