बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मिर्झनपूर व कासारी हद्दीतील पाझर तलावाजवळ शासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरुन बेकायदा विहीर खोदून शासनाचे अनुदानही लाटले. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सिताराम लाटे यांनी जिल्हाधिकार्‍यांसह विविध अधिकार्‍यांना केली होती. त्यावरुन लघुसिंचन उपिवभागाचे सहाय्यक अभियंता यांनी ग्रामपंचायतीला सदरील विहीर बुजविण्याचे आदेश दिले आहेत.
     मिर्झनपूर पाझर तलावाच्या 8 मीटर अंतरावर एकाने बेकायदा विहीरीचे काम सुरु केले. यावेळी ते कामकाज थांबिवण्याच्या तक्रारी करुनही लघुपाटबंधारे विभागाचे उपअिभयंता  यांनी संगणमत करुन बेकायदा आदेश काढून अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे उघडकीस आले. पाझर तलावाच्या बांधाजवळ स्फोट घेऊन ब्लास्टींग करण्यात आले, गटविकास अधिकारी यांना संबंधितांने 100 रुपयांच्या स्टँम्पवर खोटे शपथपत्र दिल्याचे व उपविभागीय कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा न करता तालुका कृषि अधिकारी यांनी केवळ दोन दिवसांत तालुक्यातील विहीरींचा सर्वे केल्याचे दिसून आले. बनावट स्वाक्षर्‍या करुन पंचनामे केले. सदरच्या बेकायदा कामास जवाहर योजनेतून विहीरीस अनुदान मंजूर करुन सुमारे 43687 रुपयांची संगणमताने शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
     बेकायदा विहीर बुजिवण्याबाबत आदेश दिले असले तरी अशा प्रकारच्या बेकायदा कामांना पाठीशी घालून शासनाची फसवणूक करणार्‍या अधिकार्‍यांवर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम कोणती कारवाई करतील याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
 
Top