बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : वीरशैव धर्मपूर्वीपासूनच स्वतंत्र व सनातन धर्म आहे, शासन दरबारी आपल्या धर्माची स्वतंत्र गणना नाही, त्यास हिंदू धर्मात समाविष्ट केले असले तरी भक्तांनी त्याकडे लक्ष देऊ नये, कारण भविष्य काळात धर्माच्या नावावर आरक्षण होणार नसल्याचे काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांनी म्हटले.
बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सिध्दांत शिखामणी धर्म ग्रंथाची ग्रंथदिंडी, महास्वामींची मिरवणुक काढण्यात आली. यानंतर लिंगायत बोर्डिंग येथे दहिवडकर मठाचे लिंगैक्य वरिसध्द शिवाचार्य यांच्या जन्मशतमान उत्सवानिमित्त तसेच गुरुसिध्द शिवाचार्य दहिवडकर महाराज यांच्या एकसष्ठीनिमित्त संत मन्मथ स्वामी सेवा संघाच्या वतीने आयोजित साखर, गुळ, संत्री आदींनी तुलाभार प्रसंगी भक्तांना आशीर्वचन देतांना ते बोलत होते.
यावेळी रेवणसिध्द शिवाचार्य परंडकर महाराज, गुरुसिध्द शिवाचार्य दिहवडकर महाराज, निलकंठ शिवाचार्य धारेश्वरकर महाराज, माढेकर महाराज, विश्वेश्वर याळवार आदी शिवाचार्च उपस्थित होते. याप्रसंगी सिध्दांत शिखामणी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य म्हणाले, यापुढील काळात आर्थिक आधारावरच आरक्षण देण्यात येईल. आपल्या देशात जाती जातीच्या नावाने अनेक झगडे आहेत व जातीयवाद खूप पसरत आहे. माणसाच्या विकासासाठी जात नव्हे तर आर्थिक बाब आडवी येते. हा विचार करुनच कमी उत्पन्नाच्या नागरिकांना शैक्षणिक सहायता इत्यादी सुविधा मिळतील. जयीचा शिव तयीचा शिवाचार या म्हणीप्रमाणे अत्यंत प्राचीन असलेल्या वीरशैव धर्माच्या सरकारी दरबारी नोंद घेतली नाही तरी त्याची काळजी करु नये, आपल्या धर्माचा अभ्यास, संस्कार व धर्माने वागून इतरांना आपल्या धर्मात येण्याची प्रेरणा द्यावी. पूर्वी संपूर्ण भारतभर वीरशैव धर्म होता. त्याचे पुरावे अनेक ठिकाणी सापडत आहेत. हरियाणातील राखीगडी येथील संशोधनात उत्खननात सापडलेल्या सात हजार वर्षांपूर्वीच्या मृतदेहाच्या सोबत वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतीक असलेले इष्टलिंगही सापडले आहे. संशोधकांनीच त्याची जागतिक नोंद केली आहे.
संपूर्ण शहरातून आलेली मिरवणुक आडवा रस्ता येथे बराच वेळपर्यंत पुढे सरकली नाही. यावेळी तरुण मंडळ, महिलांचा मोठा उत्साह पहायला मिळाला. या रस्त्याचे आडवा रस्ता हे नांव योग्यच आहे, पाणी अडवा पाणी जिरवा प्रमाणे उत्सव अडवून भक्तांनी मनमुराद आनंद घेतला. वीरशैव लिंगायत समाजाचे बार्शीतील सातत्याने होत असलेले धार्मिक कार्यक्रम हे सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे असतात. येथील भक्तांच्या प्रेमातून पंचिपठांच्या जगद्गुरुंनी आपल्या दोन तीन शाखा मठांची स्थापना केली. त्यामुळे बार्शीत बारा मठ आहेत. सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या अनुष्ठानची आठवण सांगत कन्नड मातृभाषा असल्याने त्यावेळी मराठी भाषेत नीटपणे बोलता येत नसतांनाही केवळ बार्शीकरांसाठी मराठी शिकून मराठीतून श्रावण मास अनुष्ठान निमित्त आशीर्वचन केले. त्यावेळच्या वातावरणाचा प्रभाव अगदी लहान मुले आपल्या डोक्यावर कापड घेऊन एक हाताने आशीर्वाद दिल्यासारखे जगदगुरुंची नक्कल करत व गणेशोत्सवाच्या आरतीनंतर होत असलेल्या जगद्गुरु विश्वाराध्यांच्या आरतीतून दिसून आले. ते प्रसंग कधीच विसरता न येण्यासारखे आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिपप्रज्वलन करण्यात आले, प्रकाश शास्त्री देवळालीकर यांनी वेदघोष केला, स्वागत गीत प्रसाद सहस्त्रबुध्दे, प्रास्ताविक प्रशांत कानडे, सूत्रसंचलन व आभार अनिरुध्द चाटी सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबासाहेब मनगिरे, माई सोपल, दादा कोरे, महिला मंडळाच्या सदस्या यांनी परिश्रम घेतले.