सोलापूर :- जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्याचा प्रश्ल बराच काळ शासनस्तरावर प्रलंबित होता हा प्रश्न जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी अत्यंत कमी वेळेत सोडवला. या कार्यात त्यांना प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी सहकार्य केले. त्याबद्दल डॉ. प्रविण गेडाम व शहाजी पवार यांचा सत्कार सोलापूर मराठी पत्रकार संघाकडून राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
    यावेळी पत्रकार संघाचे सरचिटणीस पी.पी.कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक श्रीपाद कुलकर्णी, ज्येष्ठ शल्य विशारद डॉ. सतिश वळसंगकर उपस्थित होते.
 
Top