पंढरपूर :- मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील पशुसाठी संपुर्ण रोग नियंत्रण म्हणून कार्यरत असणा-या तालुका लघु पशु वैद्यकिय चिकित्सालयाच्या (जनावरांचा दवाखाना) नुतन इमारतीचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री ना.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आ.भारत भालके, पशुसंवर्धन आयुक्त डॉ.ए.टी.कुंभार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी ना. चव्हाण यांनी  पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आलेल्या  पारितोषिक प्राप्त खिलार जनावरांची परहणी केली. तसेच  जिल्ह्यातील पशुधनाबाबतची माहिती संबधित अधिका-यांकडून जाणून घेतली.सुमारे पाऊणे दोन कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या दवाखान्यामध्ये  जनावरांसाठी क्ष- किरण, सोनोग्राफी, बायोकेमिकल एनालायझर आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या इमारत उदघाटन प्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.ज.म.डोईफोडे, सहाय्यक आयुक्त डॉ.ए.टी.परिहार,  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.भरत राठोड, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.शारदा खरवडे, डॉ.प्रमोद बाबर, डॉ.भिंगारे, डॉ.सरदेशमुख, डॉ.होनराव यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top