पंढरपूर :- उप जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अधिकारी- कर्मचा-यांसाठी बांधण्यात येणा-या निवास्थानाचे भूमीपूजन राज्याचे मुख्यमंत्री ना.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
ना. चव्हाण यांनी याप्रसंगी नवजात शिशु अतिदक्षता विभागाला भेट दिली. तसेच 'सी-आर्म' मशीनचे फीत कापून उदघाटन केले त्याचबरोबर उप जिल्हा रुग्णालयाऐवजी सामान्य रुग्णालय अशा नाम फलकाचे अनावरण केले.
या रुग्णालयाच्या प्रांगणात टाईप 1 ते टाईप 4 अशी सुमारे 51 निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम, आ.भारत भालके, आरोग्य सेवा मंडळ पुणे उपसंचालक डॉ. कांचन जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. दिनकर रावखंडे, डॉ. पंकज गायकवाड, डॉ. एकनाथ बोधले, डॉ. गिरनार गवळी, डॉ.मंदार सोनवणे, डॉ.संभाजी पाचकवडे, पुरुषोत्तम कदम, रेखा ओंबासे, आर.एन.बागल, बाजीराव नामदे, नागेश देवकर यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाचे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.