सोलापूर : नाट्य परिषदेसाठी ठेव, यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलासाठी राज्य शासनाच्या वतीने ३ कोटी ७५ लाखांचा धनादेश देत असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी केली.
पंढरपूर येथे ९४ वे अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दिपक करंजीकर, मावळते संमेलनाध्यक्ष मोहन आगाशे, विद्यमान अध्यक्ष अरुण काकडे, स्वागताध्यक्ष आ. भारत भालके, नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामदास आठवले, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशिगंधा माळी, श्रीमती उज्वलाताई शिंदे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती उज्वला भालेराव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना देवतळे म्हणाले की, नाट्यस्पर्धा आयोजित करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. यासाठी शासनाच्या वतीने अनुदान देवून रंगभूमीला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. अनुदान योजनेत अमुलाग्र बदल करुन नाटकाचा दर्जा पाहून "अ" "ब" श्रेणी करुन त्यानुसार भरघोस अनुदान दिले जात आहे. नाट्यसृष्टी, चित्रसृष्टीद्वारे राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर पारितोषिके मिळवून मराठीचे व महाराष्ट्राचे नाव पुढे नेले जाते याचा अभिमान वाटतो असे गौरवोदगार देवतळे यांनी काढले.
राज्याच्या विकासाबरोबरच सांस्कृतिक चळवळीला दिशा व प्रोत्साहन देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. गोरेगाव येथे पहिली "फिल्म युनिव्हर्सिटी" उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. त्याच्रपमाणे जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर नाट्गृह उभारणाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नाट्य चळवळीला गती देण्यासाठी, हे क्षेत्र वृध्दींगत करण्यासाठी या क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका राहील अशी ग्वाही . देवतळे यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी बोलतांना केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात हे तिसरे नाट्य संमेलन होत आहे. सुमारे सव्वाशे वर्षाची पंरपरा असलेले मराठी नाटक दिवसेंदिवस समृध्द होत आहे. तंत्रज्ञानामुळे त्यामध्ये क्रांतिकारी बदल झालेला आहे. या संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांनी "अविष्कार" या नाट्य संस्थेच्या माध्यमातून असंख्य कलाकार, नाटककार घडवलेले असल्याचे सांगून नाटकातून करमणूक, मनोरंजन झाले पाहिजे, पण हे नाटकाचे अंतिम ध्येय न राहता संस्कृती आणि संस्कार जोपासले पाहिजे. यासाठी पुन्हा एकदा नाट्यचळवळ उभी करावी, मराठी रंगभूमीकरिता प्रतिभाशाली नाटककारांचा, कलाकारांचा, निर्मात्यांचा शोध घ्यावा. यासाठी गावपातळीपासून कामाला सुरुवात केली पाहिजे. नाट्यस्पर्धाचे, नाट्संगीत स्पर्धांचे, नाट्यलेखन शिबीराचे आयोजन करुन यासाठी नव्या पिढीला उद्युक्त केले पाहिजे असे प्रतिपादन कले.
महाराष्ट्रातील रंगकर्मींच्या हातून चांगल्या कलाकृतींची निर्मिती होवो, रंगभूमीवर येणा-या नाटकाला चांगलं यश मिळो व पुन्हा एकदा मराठी रंगभूमीला तिचं पूर्वीचं वैभव प्राप्त होवो असे विठ्ठल चरणी साकडे ना. शिंदे यांनी घातले.
याप्रसंगी बोलतांना सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. त्याचबरोबरच सांस्कृतिक भूमीही आहे. नाटक हे केवळ मनोरंजन नाही तर समाजातील अनेक प्रश्न मांडून प्रबोधन करते असे प्रतिपादन केले.
या संमेलानाचे संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांनी आपल्या भाषणात शालेय व बाल रंगभूमी हा या क्षेत्राचा पाया आहे. नाट्यकलेचा शालेय अभ्यायसक्रमात समावेश करावा, शिक्षकांना नाट्यकलेचे प्रशिक्षण द्यावे, संस्कारक्षम वयातच मुलांवर नाट्यकलेचे शिक्षण मिळाले तर दर्जेदार नाटककार, कलाकार निर्माण होतील असे प्रतिपादन केले.
प्रारंभी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. महाराष्ट्रात चांगली नाट्य संस्था व्हावी यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास परिषदेच्या वतीने ती चालविण्यात येईल असे प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी स्वागताध्यक्ष आ. भारत भालके, नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामदास आठवले यांचीही भाषणे झाली.