पांगरी (गणेश गोडसे) :- कॉलेजच्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवुन तिला सहा वर्ष विविध ठिकाणी घेऊन जावुन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना बार्शी तालुक्यातील पिंपळगांव (धस) येथे घडली असुन बालात्कार केल्याप्रकरणी एका तरूणाला व त्याला मदत केल्याप्रकरणी त्याच्या आई-वडीलांवर शु्क्रवार दि. 31 जानेवारी रोजी मध्यरात्री पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद विठ्ठल पवार, तारामती विठ्ठल पवार व विठ्ठल नामदेव पवार अशी बलात्कार केल्याप्रकरणी व मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत. बार्शी शहरातील तुळजापुर रोडवरील कव्हेकर चाळीत राहणा-या अत्याचारपीडीत तरूणीने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, शरद पवार यांने तिला लग्नाचे आमिष दाखवुन ऑगस्ट 2008 पासुन 26.12.13 च्या दरम्यान धसपिंपळगांव येथे तसेच बार्शी शहरातील आनंद लॉज, किंगमेकर ऍकॅडमी अलिपुर रोड बार्शी, अंबिका लॉज औरंगाबाद तसेच उस्मानाबाद पोलिस मुख्यालयातील शासकीय निवास्थानी या ठिकाणी वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. मात्र नंतर लग्नाला नकार दिला. आरोपीच्या आई-वडीलांनी बलात्कार करण्यास मदत करूण लग्न करण्यास विरोध केला. बलात्कारपीडीत तरूणीच्या फिर्यादिवरून तिघांविरूदध पांगरी पोलिसात लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करन्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि.शरद मेमाणे हे करत आहेत.