विजय पांढरे
उस्मानाबाद -: आम आदमी पार्टीचे नेते आणि निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांची तुळजापूर, उस्मानाबाद आणि कळंब येथे रविवार दि. २ फेबु्रवारीरोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
    तुळजापुरात दुपारी बारा वाजता पुजारी मंडळ मंगल कार्यालयात, उस्मानाबाद येथे दुपारी ४ वाजता रायगड फंक्शन हॉलमध्ये तर कळंब येथे सायंकाळी ६ वाजता मेन रोड येथे या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
    या जाहीर सभेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक केरबा गाढवे, सहसंयोजक डॉ.महादेव पाटील,तुळजापूरचे संयोजक धनाजी कुरूंद, कळंबचे संयोजक दत्तात्रय तनपुरे यांनी केले आहे.
 
Top