तुळजापूर : चार वर्षीय चिमुकलीचा हौदात पडल्‍याने बुडून मृत्‍यू झाल्‍याची घटना तुळजापूर येथे शुक्रवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारी घडली.
    श्रावणी नंदू शेट्टी (वय 4 वर्षे, रा. तुळजापूर) असे हौदात बुडून मृत्‍यू झालेल्‍या चिमुकलीचे नाव आहे. श्रावणी शेट्टी या चिमुकलीला घेऊन तिची आई एका बांधकामावर मजुरीच्या कामासाठी गेली होती. आई काम करीत असताना ही मुलगी तेथेच बाजूला खेळत होती. मात्र खेळता-खेळता ती पाण्याच्या हौदाजवळ गेली व आत पडली. सायंकाळी पाचच्या सुमारास आईने शोधाशोध केली असता ती हौदात पडल्याचे दिसून आले. तिला तातडीने येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.
 
Top