बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सातत्याने चांगल्या सेवेतून ग्राहकांच्या विश्वासाला पात्र राहून व्यवसाय वृध्दींगत केल्याने विश्वेश्वर सहकारी बँक शेड्यूल्ड देर्जा प्राप्त होण्यास सक्षम झाल्याची माहिती संचालक नंदकुमार होनराव यांनी दिली.
मल्टिस्टेटचा दर्जा प्राप्त झालेल्या विश्वेश्वर बँकेची मुख्य शाखा पुणे येथे असून बँकेची स्थापना १९७२ साली झाली, आज २४ शाखा कार्यरत आहेत, १८३१ कोटींच्या व्यवसायात १११० कोटींच्या ठेवी व ७२१ कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे.
मार्चअखेर २ हजार कोटी व्यवसायाचे उद्दीष्ट असून, एटीएम, पॅनकार्ड, सीटीएस चेक सुविधा, डायरेक्ट आरटीजीएस व एनईएफटी चा समावेश, बँकेस आयएफएससी स्वतंत्र कोड मिळाल्याने ग्राहकांना चांगली सुविधा प्राप्त झाली आहे.
बँकेचे संस्थापक कै.नामदेवराव रुकारी यांनी पाहिलेले स्वप्न ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आवश्यकतेनुसार कर्जपुरवठा योजना अंमलात आणल्या आहेत. सातारा येथे नुकतीच नवीन शाखा सुरु झाली असून पंढरपूर, शिवाजीनगर, चिंचवड येथील नवीन शाखेचे काम प्रगतीपथावर आहे.
बँकेच्या विकास, प्रगतीसाठी अध्यक्ष सुनिल रुकारी, उपा राजेंद्र मिरजे, संचालक अनिल गाडवे, सरव्यवस्थापक चिंतामणी वैजापूरकर सतत प्रयत्नशील आहेत. बार्शी शाखा मागील पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे सध्या ६८ कोटींच्या ठेवी, ४९ कोटींचे कर्ज, ११७ कोटींचा व्यवसाय करुन थकबाकीरहित शाखा आहे. जवळपास ७० टक्के मोठ्या प्रकल्पांना कर्जपुरवठा करुन बार्शी शाखेला गौरव प्राप्त करुन दिला आहे. संचालक होनराव यांच्या जनसंपर्क व योग्य धोरणांमुळेच हे शक्य झाल्याची माहिती शाखा व्यवस्थापक अनिल खजानदार यांनी दिली.