बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी शहरात सुमारे अडीचशे मंडळांनी शिवजयंती उत्सव साजरा केला. ग्रामीण भागासह प्रत्येक गल्लीबोळांतही शिवाजी महाराजांचे मावळे मोठ्या दिमाखात भगवी पताका डौलवितांना दिसून येत होते. शिवछत्रपती हे कोणत्याही एका समाजाचे आराध्यदैवत नसल्याचे मुस्लिम समाजाने दाखवून दिले. मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन अभिवादन केले.
शिवजयंतीच्या निमित्ताने बार्शी शहरात या सप्ताहामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबिवले जात आहेत. शिवाजी महाजांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या तरुणाईचे दर्शन भव्य दुचाकीस्वारांच्या रॅलीवरुन निदर्शनास आले. शिवजयंती निमित्त राज-विजय क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता भगवंत मैंदानावरून रॅलीकरिता शहरातील सबंध तरुणाई अवतरली असल्याचे चित्र दिसत होते. भगवंत मैंदानावरून सुरू झालेली रॅली शहरातील महाद्वार चौंक, जुनी चाटे गल्ली, स्टेशन रोड, स्टॅण्ड चौंक,पांडे चौंक या प्रमुख मार्गावरून शिवाजी महाविद्यालया जवळील शिवाजी महराजांच्या पुतुळ्यास हार अर्पण करून या रॅलीची सांगता करण्यात. यावेळी राज-विजय क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने राजेंद्र राऊत यांनी शिवभक्तांना मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांचा आदर्श व स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेली मेहनत व त्यांचे आचार विचारांचे दर्शनच त्यांनी यावेळी शिवभक्तांना घडविले. भव्य रॅलीमध्ये सहभाग घेणार्या तरुणाईचे त्यांनी आभार मानले तर २२ फेब्रुवारी रोजी होणार्या भव्य मिरवणूकीमध्ये सहभाग नोंदिवण्याचे अवाहन केले. शिवजयंती ही विशिष्ट्य समाजाकरिताच मर्यादीत नसल्याने आज सर्वधर्म समावेशकाने शिवजयंती होत असल्याची गोष्ट ही अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अरूण (दादा)बारबोले, सभापती कौंशाल्या माळी, दिपक राऊत, प्रा सावळे, दादा गायकवाड उपस्थित होते. यामध्ये हजारोंच्या वतीने रॅलीमध्येतरुणांनी सहभाग नोंदिवला होता. रॅलीच्या दरम्यान शहरातील आम्ही बार्शीकर परिवाराच्या वतीने अल्पहाराचे नियोजन करण्यात आले होते. तर रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत, चंद्रकांत पवार, विनोद (नाना) वाणी, विनोद काटे, अभिजीत राऊत, मंदार कुलकर्णी, नागजी राऊत, निलेश मस्के अमित सावंत यांनी परिश्रम घेतले.

श्री शिवतेज मंडाळ आयोजित पोवाडे व लोकनृत्य
शिवाजी महराजांचा सुवर्ण इतिहासाचे दर्शन घडिवण्यासाठी बालशाहीर हेरंब पायगुडे याचे पोवाड्याचे दर्शन शहवासियांना झाले तर त्याच्या सहकार्यांच्या वतीने लोकनृत्य व तलवारबाजीचा मराठमोळा कर्यक्रम शिवतेज मंडळाच्या वतीने साकारण्यात आला होता. तर भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन या मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. मूकबधिर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्राचे वाटप
केंद्र शासन अंगीकृत ए.डी.आय.पी या योजनेअंतर्गत अपंग वित्त विकास महामंडळ, मुंबई यांच्या वतीने आगळगांव येथील मूकबधीर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना बी.टी. कंपनीचे अत्याधुनिक वैंयक्तिक श्रवण यंत्राचे मोफत वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी अपंग वित्त विकास महामंडळाचे शेअरसिंग यांनी श्रवणयंत्र वापरण्याबाबत तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकासात वाढ करावी याविषयी मार्गदर्शन केले.