सोलापूर -: सन 2012-2013 या वर्षाच्या माहितीवर आधारित भरावयाची माध्यमिक शाळांसाठीची प्रतवारी मंडळाच्या www.gradation.msbshse.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांनी ऑनलाईन प्रतवारी भरण्याची अंतिम तारीख दिनांक 31/01/2014 अशी होती.
       परंतु ज्या माध्यमिक शाळांनी दि. 31/01/2014 पर्यंत प्रतवारी अद्यापही भरलेली नाही अशा माध्यमिक शाळांना दि. 15/02/2014 पर्यंत प्रतवारी भरण्याबाबत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच ज्या माध्यमिक शाळा दि. 15/02/2014 पर्यंत प्रतवारी भरणार नाहीत, त्या माध्यमिक शाळांचे इ.10 वीच्या विद्यार्थ्यांचे Hall Ticket त्यांना देण्यात येणार नाही याची नोंद घेण्याचे विभागीय सचिव, पुणे विभागीय मंडळ, पु    णे यांनी एका पत्रानव्ये कळविले आहे.
 
Top