सोलापूर -: नागपूर येथे किसान वसंत 2014 प्रदर्शनाकरिता तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रामधून सुमारे 50 गावाचे 405 शेतक-यांनी भाग घेतलेला आहे. दि. 10 जानेवारी रोजी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार दिलीप माने, सभापती श्रीमती इंदूमती अलगौडा पाटील, तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रफीक नाईकवाडी व तालुका कृषी अधिकारी एन. टी. गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून 9 एस. टी. गाडी प्रदर्शनास रवाना करण्यात आल्या.
सदर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे यांत्रिक औजारे, आधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ शास्त्रज्ञांचे परिसंवाद, मार्केटींग व शेतीपूरक व्यवसाय बाबत मार्गदर्शन होणार आहे. हा अभ्यास दौरा आत्मा व कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला.