उस्मानाबाद :- तेनझिंग नॉर्गे राट्रीय पुरस्कार सन 2013 साठी प्रस्ताव 25 फेब्रुवारी पर्येत पाठवावेत, या पुरस्कारासाठी खेळाडुंची मागील तीन वर्षातील सन 2011, 2012, आणि 2013 मधील खेळाडुंची कामगिरी अतिउत्कृष्ट साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील साहसी असणे आवश्यक आहे. त्याबाबतची माहिती दोन ते तीन पानामध्ये हिंदी किंवा इंग्रजी या भाषेमध्ये पाठवावावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय कुलकर्णी यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.
प्रस्तावासोबत कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कात्रणे आदि सोबत जोडुन कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय, श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद या नावाने पाठवावेत.
प्रस्तावासोबत कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कात्रणे आदि सोबत जोडुन कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय, श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद या नावाने पाठवावेत.