मुंबई -: शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे अधिक प्रभावीपणे व जलदगतीने लोकांपर्यत पोहचविण्यास प्राधान्य देणार असल्याचे माहिती व जनसंपर्क सचिव पदाचा कार्यभार स्वीकारताना मनीषा पाटणकर- म्हैसकर यांनी सांगितले. गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत राज्य शासनाने अनेक चांगले लोकोपयोगी निर्णय घेतले, धोरणे जाहीर केली. त्याचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी शासन व जनता यांच्यात प्रभावी संवाद आवश्यक असून माहिती महासंचालनालयातील मुख्यालय व विभागीय कार्यालये तो संवाद अधिक प्रभावी करतील. त्यासाठी वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, एफ्,एम. वाहिन्या, इंटरनेटसारखी माध्यमे यांचाही सुयोग्य वापर करण्यात येणार असून प्रसार माध्यमांचेआवश्यक ते सहकार्य यासाठी मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्तकेला.
श्रीमती पाटणकर-म्हैसकर यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व अन्नऔषध प्रशासनाच्या सचिव पदाचा कार्यभारअसून माहिती व जनसंपर्क सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपविण्यात आलाआहे. तत्पूर्वी 2006 ते 2009 या कालवधीतही त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार होता. त्यावेळी शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाला संपूर्णपणे नवे व जनताभिमुख आकर्षकरुप देणे, वर्गणीदारांची संख्या 5 लाखांपर्यत नेणे, मराठी सोबतच उर्दू व इंग्रजी लोकराज्य सुरु करणे, दूरदर्शनवरील ‘जयमहाराष्ट्र’ व ‘साप्ताहिक महाराष्ट्र’ हे कार्यक्रम, आकाशवाणीवरील‘ दिलखुलास’ हा आठवडयातील सहा दिवस प्रसारित होणारा कार्यक्रम, देशातील पहिले शासकीय न्यूज वेबपोर्टल ‘महान्यूज’ यासारख्या अनोख्या उपक्रमांतून शासनाचे प्रसिध्दी महासंचालनालय अधिक संवादी केले होते.
1992 च्या बॅचच्याआय.ए.एस. अधिकारी असणा-या मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी अमरावती येथे महापालिका आयुक्त, सांगली जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक तथा सचिव व जवळपास पाच वर्षे त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात आमूलाग्र सुधारणा घडवून आणणे, मलेरिया-डेंग्यू, स्वाईनफ्लूचे प्रभावी नियंत्रण, रुग्णालयांचे नूतनीकरण, पालिकेत 24x7 कार्यरत असणारा हॉटलाईनने जोडलेला अद्ययावत आपत्कालीन कक्ष इ. कामांसाठी त्यांची कारकीर्द वाखाणली गेली आहे.