कळंब -: गौर (ता. कळंब) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची सहल रायगड किल्ला पाहण्यासाठी गेली होती. किल्ला पाहून परतत असताना पायरीवरुन पाय घसरल्याने एका १२ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. या विद्यार्थिनीचा महाड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गौर गावावर शोककळा पसरली आहे.
छाया कुंभार (वय 12 वर्षे, रा. गौर, ता. कळंब) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. गौर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची सहल ३0 जानेवारी रोजी येथून रवाना झाली होती. ९६ विद्यार्थी व ८ शिक्षक यांच्यासाठी दोन बसेसची सोय करण्यात आली होती. पहिल्या दिवशी शिखर शिंगणापूर, महाबळेश्वर आणि प्रतापगडाला भेट दिल्यानंतर महाड येथे मुक्काम केला. ३१ जानेवारी रोजी सकाळी ही सहल रायगड पाहण्यासाठी रवाना झाली. दिवसभर रायगड किल्ला पाहिल्यानंतर हे विद्यार्थी परतीच्या प्रवासाला लागले होते. किल्ल्याच्या अवघ्या १0 पायर्या उतरणे बाकी असतानाच सहावीच्या वर्गातील छाया कुंभार ही विद्यार्थिनी सायंकाळी ५.३0 वाजण्याच्या सुमारास पाय घसरुन पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली.
उपस्थित शिक्षकांनी तातडीने महाड येथील नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच तिची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी महाडकडे धाव घेतली. सदरील घटनेचे वृत्त गावामध्ये समजताच गावावर शोककळा निर्माण झाली आहे. छाया कुंभार हिच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे