अनुजा पवार
उस्मानाबाद : जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या 'लेक वाचवा, लेक शिकवा' या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जि.प. प्राथमिक शाळा सांगवी येथील अनुजा संतोष पवार या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल गटाशिक्षणाधिकारी सोनवणे, शाळेचे सर्व शिक्षक, मुख्‍याध्‍यापक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
 
Top