भूम : तालुक्‍यातील भोगलगाव व वारेवडगाव येथे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्थानिक खासदार निधीतुन पूर्ण झालेल्या सभागृहाचे उद्घाटन खा.डॉ. पद्मसिंह पाटील व परंडा-भूम-वाशीचे आ. राहुल मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
    या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंत पाटोळे, सुनिल भोईटे, प्रविण खटाळ, अशोक वरळे, तानाजी पाटील, अशोक नलवडे, मोहन कारकर यांच्यास सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांसोबत चर्चा करीत असताना भोगलगाव कासारी व वारेवडगाव या भागात जनावरांची संख्या भरपूर असल्यामुळे या भागाकरीता जनावरांसाठी आरोग्य उपकेंद्र लवकरच मंजूर करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे खा.डॉ.पाटील यांनी सांगितले.
 
Top